राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पै. तुषार वाघ यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पै. तुषार वाघ यांची निवड
 माढा प्रतिनिधी.... माळशिरस तालुक्यातील लवंग येथील तुषार वाघ यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली.
 
या निवडीचे पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय
मा.श्री. विजयसिंह ( दादासाहेब ) मोहिते-पाटील 
तसेच आदरणीय खासदार मा.श्री. धैर्यशील (भैयासाहेब) मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष श्री.गणेश पाटील यांच्या हस्ते पै. तुषार वाघ यांना देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचाराची माढा तालुक्यातील पूर्व भागाची धुरा पैलवान तुषार वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या भागात त्यांनी चांगली प्रचार यंत्रणा राबवून युवकांचे संघटन तयार करून मताधिक्य मिळवून दिले होते. या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची निवड केली आहे. 
       यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील युवकांमधून अभिनंदन होत आहे. व योग्य निवड केलेची चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पै तुषार वाघ म्हणाले की,
देशाचे नेते मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब 
आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा.श्री. विजयसिंह (दादासाहेब)
मोहिते-पाटील साहेब 
खासदार मा.श्री.धैर्यशील भैयासाहेब मोहिते-पाटील,
 यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली घराघरात गावा गावात राष्ट्रवादी पोहचवण्याच मी काम करेन व तळागाळातील सर्वसामान्यांचे  प्रामाणिक पणे काम करण्याच प्रयत्न मी करेन  ..

यावेळी शिवाम्रुत दुधसंघाचे व्हा.चेअरमन श्री. दत्तात्रय भाऊ भिलारे,जि.प.सदस्य अरूण तोडकर,सरपंच प्रशांत पाटील,मधुकर वाघ,रामचंद्र चव्हाण,उत्तम भिलारे,स.म.शं.मो.पा. सा. कारखान्याचे माजी संचालक धनंजय चव्हाण,उत्तम भोसले, उपसरपंच प्रशांत भिलारे,सचिन वाघ,नितीन वाघ,युवराज वाघ,शहाजी वाघ,शिवाजी वाघ,आभिजीत पाटील,रणजित चव्हाण,औदुंबर वाघ,दत्तात्रय जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments