माढा नगरपंचायत व संत निरंकारी मंडळ माढा यांच्या वतीने 1075 रोपांचे वृक्षारोपण

माढा नगरपंचायत व संत निरंकारी मंडळ माढा  यांच्या वतीने माढा येथील क्रीडा संकुलात 1075 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ .मीनल ताई साठे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संत निरंकारी मंडळाच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.या.कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते.  मा. दादासाहेब साठे जिल्हा काँग्रेस नेते, मा. अरुण कदम सभापती ,मा.नाना साठे सभापती ,मा. विकास साठे सभापती,  अनिता सातपुते माजी नगराध्यक्षा ,मा. चरण कोल्हे मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत माढा ,संत निरंकारी मंडळाचे मुखी समाधान राऊत, दत्ता मोरे, संतोष गाडे ,तानाजी कदम,नागनाथ थोरात, अमर कदम,ज्ञानेश्वर पायगण,  सर्व नगरसेवक, संत निरंकारी मंडळाचे भक्त गण उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments