प्रा.लक्ष्मण कदम सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माढा येथील महाराणा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार केवड येथील प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्राध्यापक श्री.लक्ष्मण कदम सर यांना हा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या मंडळाचे आधारस्तंभ नगरपंचायतीचे  सभापती अरुण कदम यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविला जातो.या कार्यक्रमासाठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.मिनल ताई साठे, पोलीस निरिक्षक श्याम बुवा, उप नगराध्यक्षा सौ. कल्पना जगदाळे, सभापती विकास साठे ,सभापती नाना साठे ,नगरसेवक आजिनाथ माळी , सर्व नगरसेवक ,महाराणा गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा.कदम यांना मिळालेल्या या पुरस्कारचे सर्वत्र कौतुक होत आहे . त्याचें संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण , संस्थेचे मार्गदर्शक गणेश चव्हाण, कालिदास चव्हाण व सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments