कपिलापुरी ग्रामपंचायतच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा
परंडा प्रतिनिधी - ६जून हा दिवस स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक दिन हा महाराष्ट्र राज्य सरकारने शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याच्या आदेश्याचे पालन करत कपिलापुरी ग्रामपंचायत यांच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून भगवा ध्वज पूजन करण्यात आले. भगवी जरी पताका फडकवून हा उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच वैभव आवाने,उपसरपंच विलास भोसले,ग्रा.प.सदस्य,श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत पाटील,रणजीत जैन,शिवाजी पाटील,स्वयंम आवाने,बापु शिंदे,संतोष डाके,संगणक परिचारक नितीन शिंदे,पोस्ट ऑफिसचे प्रशांत नरुटे,सतपाल आवाने,ग्रा.प.कर्मचारी बाहुबली मसलकर, उपस्थित होते.
( शिवपाईक शिवश्री रणजीत महादेव पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वतःच्या MH 25 AS 7005 या बोलेरो गाडी मध्ये शिवमूर्ती स्थापना करण्यात आली.प्रमुख आकर्षण म्हणून शिवमूर्तीस ३ तोळे सोन्याचे लॉकेट हार म्हणून अर्पण करण्यात आले. यावेळी अरिहांत कार डेकोर चे सर्वेसर्वा महेश आवने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा