माढा प्रतिनिधी... स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा.. मराठा महासंघाचे सरचिटणीस गणेश चव्हाण सर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड या प्रशालेत माथाडी कामगारांचे आराध्यदैवत व अखिल भारतीय मराठा माहासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या 42 वी पुण्यतिथी केवड आश्रमशाळामध्ये साजरी करण्यात आली..
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केवड आश्रमशाळेचे आधारस्तंभ व
अखिल भारतीय मराठा माहासंघाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चव्हाण तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील व्यवस्थापक कालिदास चव्हाण सयाजी चौगुले कमलाकर साखळे हे व्यासपीठावर उपस्थित होते..
22 मार्च 1982 रोजी या दिवशी महाराष्ट्र सरकारने जर " मराठा समाजाला सूर्य उगवण्याच्या आत आरक्षण जाहीर नाही केले " तर दुसर्या दिवशीचा सुर्य हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही ही भिष्मप्रतिग्या लाखो लोकांच्या समोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी 22 मार्च 1982 रोजी घेतली शपथ घेत असताना कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या एका डोळ्यात अश्रु तर दुसर्या डोळ्यात अंगार होता.
23 मार्च 1982 रोजी सकाळी या मराठयांच्या क्रांतीसुर्याने आपला शब्द खरा करून दाखवला त्यांनी आपल्या राहत्या घरी आमदार असताना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या मेंदूत रिव्हॉल्वर ने गोळी झाडून घेतली कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नंतरही अजुन मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अखिल भारतीय मराठा माहासंघाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री.गणेश चव्हाण यांनी प्रतिपादन केले..
कार्यक्रमाच्या शेवटी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
टिप्पणी पोस्ट करा