आम्ही जरांगे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या लहानपणीच्या भूमिकेत केवड गावातील बाल कलाकार विराज लटके

आम्ही जरांगे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या लहानपणीच्या भूमिकेत केवड गावातील बाल कलाकार विराज लटके.... माढा प्रतिनिधी .. संपूर्ण महाराष्ट्रात 14 जून रोजी योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा  हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये माढा तालुक्यातील केवड येथील विराज गणेश लटके हा इयत्ता सातवी मध्ये  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लहानपणी ची भूमिका साकारली आहे. माढा तालुक्यातून प्रथमच एक बालकलाकार चित्रपटात दिसणार आहे यापूर्वीही विराज लटके यांनी वेगवेगळ्या मालिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवलेले आहे .त्याची ही  भूमिका पाहण्याची प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे.  या चित्रपटामध्ये मराठ्यांच्या एकजुटीची मशाल हाती घेऊन निघालेल्या गरजवंत मराठ्यांच्या संघर्षाची कहाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नारायणा प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे शूटिंग पुणे ,परभणी ,बीड ,जालना या परिसरातील ग्रामीण भागात झालेले आहे. या चित्रपटांमध्ये प्रमुख कलाकाराच्या भूमिकेत मकरंद देशपांडे, सुबोध भावे ,प्रसाद ओक, अजय पुरकर विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत ,अमृता धोंगडे ,अंजली जोगळेकर ,आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे, पृथ्वीराज थोरात आदि कलाकारांची मादियाळी दिसणार आहे.

0/Post a Comment/Comments