बचत गटातील महिलांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविणार नगराध्यक्षा मीनल ताई साठे

 


बचत गटातील महिलांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविणार नगराध्यक्षा मीनल ताई साठे

माढा : बचत गटातील महिलांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविणार नगराध्यक्षा मीनल ताई साठे माढा तालुक्यातील केवड येथील समज्योती महिला स्वयंसहायता समूह यांच्यावतीने नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी मिनल ताई साठे यांची निवड झाल्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला 

यावेळी बचत गटातील महिलांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या यामध्ये घरकुल ,शौचालय, रेशनिंग धान्य , सॅनिटरी पॅड मोफत मिळणे अशा अनेक अडचणी सांगीतल्या. यावर त्यानी  महिलाच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले .

यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती लटके ,रोहिणी पिंजारी, रतन लटके,राधा पिंजारी, उषा धर्मे, वैशाली धर्मे, निता लटके, गंगू धर्मे, रंजना सोनशिळे,इ उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments