*केवड आश्रम शाळेच्या धनाजी मारकड यांना मुख्याध्यापक संघाचा गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान

*केवड आश्रम शाळेच्या धनाजी मारकड यांना मुख्याध्यापक संघाचा गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान*



माढा / प्रतिनिधी 

 केवड (ता.माढा) येथील माध्यमिक आश्रम शाळा केवड,  येथील शिक्षकेतर कर्मचारी धनाजी मारकड यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण परिषदचे शिक्षण उपसंचालक विकास गरड, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापिठाचे सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे, माजी प्राचार्य वामन माने, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, उपाध्यक्ष महेश सरवदे, विश्रांत गायकवाड, सचिव बापू नीळ, विद्यासचिव भिकाजी कुलकर्णी,  यांच्या प्रमुख उपस्थितीत धनाजी मारकड यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुस्तक, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

धनाजी मारकड गेल्या 26 वर्षांपासून केवड आश्रम शाळेत कार्यरत आहेत. आपली शाळेतील जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत  त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

धनाजी मारकड यांना गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड चे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण  मार्गदर्शक गणेश चव्हाण, कालिदास चव्हाण  मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील सर प्राथमिकचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे गणेश चव्हाण कालिदास चव्हाण प्रकाश जाधव सर कमलाकर साखळे सर दत्तात्रय काकडे सर शिवाजी शिंदे सर युवराज जगदाळे सर लक्ष्मण कदम सर नितीन सलगर सर सरिता चव्हाण मॅडम गीतांजली राऊत मॅडम साधना घोंगडे मॅडम मनीषा खरतडे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी धनाजी मारकड यांचे अभिनंदन केले.

2/Post a Comment/Comments

टिप्पणी पोस्ट करा