जि.प्रा.शाळा केवड च्या चिमुकल्यांच्या दिंडीतुन विठूरायाच्या नामघोशाचा गजर ....
माढा.प्रतिनिधि- माढा तालुक्यातील केवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केवड येथील चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठूरायाच्या नामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली.
यावेळी अनेक विध्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम, नामदेव , सोपान ,मुक्ताबाई यांच्या वेषभूषात होते .टाळ, मृदूंग ,वीणा, यांच्या जोडीला अंभगाची साद घालून विठूरायाच्या नाम घोशाचा गजर करण्यात आला. भगव्या पताका ,तुळशी लहान मुलींनी रखुमाई ची वेषभूषा साकारताना परिधान केलेल्या साड्या हे या दिंडीचे खास आकर्षण ठरले .त सेच ,
गावातील अंगणवाडीमध्ये दिंडी निमित्ताने लहान बाळ गोपाळ सुद्धां वारकरी वेषभूषात येऊन विठूरायाच्या नामाचा गजर करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका आपुणे,लटके, सोनशिळे,मदतनीस गायकवाड,खोत उपस्थित होत्या.
हि दिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब भोईटे, सहशिक्षक जाधव सर ,चव्हाण सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान लटके, हभप भाऊसाहेब गुंड, चोपदार मधुकर धर्मे, दत्तात्रय जाधव, आदि प्रयत्नशिल होते.
टिप्पणी पोस्ट करा