माजी मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुखांच्या स्मृती दिनी मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शिबिराचे उद्घाटन.....


 माजी मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुखांच्या स्मृती दिनी मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शिबिराचे उद्घाटन.....


समाजाभिमुख उपक्रमातून स्व विलासरावांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजन  अॅड धनाजीराव साठे

माढा प्रतिनिधी:-स्व विलासराव देशमुख यांचा  माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसोबत कायम स्नेह होता.तालुक्यातील जनतेसोबत साहेबांच्या मनात कायम आपुलकी होती. यामुळेच त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या स्मृती दिनी मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्याचे सांगत डाॅ गणेश इंदुरकर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षापासून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.वैद्यकीय सल्ल्यानुसार रूग्णांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन श्री संत कुर्मदास साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार अॅड धनाजीराव साठे यांनी यावेळी केले.

  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृती दिनानीमित्त सहकार महर्षी गणपतराव साठे प्रतिष्ठान श्री संत कुर्मदास साखर कारखाना क्रांती साठे मंडळ आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय माढा येथे 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत  मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.त्याचे उद्घाटन प्रसंगी अॅड साठे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रारंभी अपघाती निधन झालेले माजी आमदार विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  

  यानंतर माजी मुख्यमंत्री  स्व विलासराव देशमुख आणि सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने नेत्रशस्त्रक्रियेसाठी  बांधण्यात आलेल्या अद्ययावत अशा ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

   

याप्रसंगी नेत्रतज्ञ डाॅ गणेश इंदुरकर यांनी उपस्थित रूग्णांना मार्गदर्शन करताना मोतीबिंदु हा एक अंधत्वाचे मुख्य कारण असून बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार वाढत आहे.म्हणून  40 वर्षानंतर प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्यांच्या समस्येवर नागरिक दुर्लक्ष करू नये .खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी जास्त खर्च येतो.

बालकांच्या डोळ्यांच्या समस्यांबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा सजग असून आतापर्यंत जिल्ह्यात अडीच लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आल्याचे डाॅ इंदुरकर यांनी सांगितले.

साठे परिवाराने सर्वसामान्य रूग्णांसाठी चांगल्या प्रकारचे नियोजन केले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात  कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी दृष्टीहिनांना दृष्टी देण्यासाठी स्व विलासराव देशुमखांच्या स्मृतिदिनी  आयोजित मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात रुग्णांच्या शस्त्रक्रियेसह निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.आतापर्यंत 800 ते 900 रुग्णांच्या विनातक्रार यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे सांगून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास यावेळी संत कुर्मदास कारखान्याचे उपाध्यक्ष सुधीर पाटील अॅड बी डी पाटील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सौदागर जाधव नगरपंचायत च्या  नगराध्यक्षा मिनलताई साठे  उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे कारखान्याचे संचालक सर्वश्री राहुल पाटील सिराजभाई शेख दिपक देशमुख मधुकर चव्हाण बाळासाहेब पाटील बापू नाईकवाडे नारायण गायकवाड कार्यकारी संचालक पवार साहेब  नगरपंचायतीचे सभापती सर्वश्री नितीन साठे विकास साठे अरूण कदम नगरसेवक अजिनाथ माळी सुनिता राऊत शबाना बागवान गीतांजली देशमुख रेशमा लंकेश्वर मोहिनी नेटके निर्मला थोरात वंदना लंकेश्वर यांचे सह नेत्रतज्ञ डॉ श्रीमती चाकणे मॅडम  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवाजी थोरात डाॅ सचिन येताळकर  डाॅ प्रीती भंडारे डाॅ कैलास गिरी डाॅ नागरिन डांगे डॉ सदानंद व्हनकळस डाॅ अशोक मेहता डाॅ टोंगळे डी एम कदम विष्णुपंत वास्ते डाॅ विकास मस्के डाॅ निखिल लोंढे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे श्री मलंग व  मोठ्या संख्येने रूग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण राऊत यांनी तर आभार प्रदर्शन संचालक नारायण गायकवाड यांनी केले.

0/Post a Comment/Comments