रुद्र राऊत ची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड...
प्रतिनिधी : बार्शी,
क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने शालेय तालुकास्तरीय, कराटे स्पर्धा २०२५-२६ , दि. २४ ऑगस्ट रोजी अर्णव प्रशाला वैराग,येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये सुयश विद्यालय, बार्शी मधील इ ८वी तील विद्यार्थी कु.रुद्र सुधीर राऊत याने तालुकास्तरीय (१७ वर्षे वयोगट मुले) ३५ किलो वजनगटात कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या निवडी बद्दल सुयश विद्यालयाचे संस्थापक मार्गदर्शक शिवदास नलवडे सर, संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे, प्रसाद नलवडे, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप, उप मुख्याध्यापक संदीप येवले, क्रीडा शिक्षक अतुल जाधव यांनी अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा