जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघजाईमळा (वाडीकुरोली) चे तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत घवघवीत यश....

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघजाईमळा (वाडीकुरोली) चे तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत घवघवीत यश....

जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड....

पंढरपूर प्रतिनिधी..
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय खो खो स्पर्धा..
बुधवार दिनांक १८ /१२ /२०२४ रोजी शांतीनिकेतन विद्यालय कोर्टी तालुका पंढरपूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि .प .प्रा. शाळा वाघजाईमळा (वाडीकरोली ) या शाळेने खो - खो स्पर्धेत मुलींच्या लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. क्रमांक 
 मिळविल्याबद्दल पंढरपूरचे तहसीलदार श्री.लंगोटे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री.मारुती लिगाडे साहेब ,केंद्रप्रमुख श्रीम. शारदा रासकर मॅडम व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले . तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री .संजय दुपडे व सहशिक्षक श्री.सचिन शिंदे सर यांचाही सन्मान करण्यात आला . तसेच मोहोळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  शुभेच्छा देण्यात आल्या .

चौकट .. शाळेचे मुख्याध्यापक संजय दुपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत खो-खो स्पर्धेमध्ये ज्या ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दुपडे सरांनी सेवा केलेली आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा संघ तालुकास्तरीय खो खो स्पर्धेपासून, राज्यस्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेपासून जिल्हास्तरीय स्पर्धेपर्यंत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे .
या शाळेतून शिकून पुढील शिक्षणा साठी गेलेल्या ५ मुली नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत चमकल्या आहेत .
 दुपडे सरांची खेळाविषयी असलेली आवड व त्यांच्यातील प्राविण्य यामुळे या शाळेचे विद्यार्थी चमकलेले आहेत .शाळेतील पालकाकडून व ग्रामस्थांकडून सरांच्या कामाचे कौतुक होत आहे..

0/Post a Comment/Comments