स्वच्छता या गुणांची जोपासना विद्यार्थ्यांनी बाल वयातच करावी... .... मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस.गणेश चव्हाण सर

स्वच्छता या गुणांची जोपासना विद्यार्थ्यांनी बाल वयातच करावी... .... मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस.गणेश चव्हाण
माढा प्रतिनिधी....
क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत माय भारत कार्यालय सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सप्ताह  समारोप काल महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आश्रम शाळा केवड येथे पार पडण्यात आला. या सप्ताह अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे मार्गदर्शक गणेश चव्हाण सर व शाळेचे व्यवस्थापक कालिदास चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा परिसरातील स्वच्छता, माढा वैराग रोड लगत ची स्वच्छता करण्यात आली व शाळेत  विद्यार्थ्यांना स्वच्छता या विषयावरती वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा व पृथ्वीराज चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय या तिन्ही शाखांमध्ये सदरील स्पर्धा घेण्यात आल्या.  गावामधून शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून स्वच्छता संदेशाच्या घोषणा देण्यात आल्या. 
स्वच्छता सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील, शिवाजी शिंदे, प्राध्यापक  सौ.सरिता चव्हाण, शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक  परिश्रम घेतले. 
सदर सप्ताह मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

0/Post a Comment/Comments