भैरवनाथ प्रशालेत दहावीच्या निकालात मुलींची बाजी
माढा प्रतिनिधि.- माढा तालुक्यातील केवड येथील भैरवनाथ प्रशालेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे .गेल्या सात -आठ वर्षा पासून सलग 100टक्के दहावी चा निकाल लागत आहे .
यावेळी प्रथमच पहिले तिन्हीं क्रमांक मुलींनी मिळविले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कु.पूजा शिवाजी सिरसट 87 टक्के, दुसरा क्रमांक कु.साक्षी अमोल सिरसट 85 टक्के ,तिसरा क्रमांक कु.स्वप्नाली अभिमान धर्मे 84.40 टक्के, तर चतुर्थ क्रमांक कु.सरोजनी संजय धर्मे 84 टक्के असे मार्क सर्व मुलींनी मिळविले बद्दल प्रशालेत या मुलींचा सत्कार केवड गावचे माजी उपसरपंच दत्तात्रय लटके व संपादक समाधान लटके यांच्या हस्ते गुलाब पुस्प व पेढे देऊन करण्यात आला.
यावेळीं समाधान लटके यांनी मुलींचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी मदत समज्योती महिला फाऊंडेशन मार्फत मदत करनार असे जाहीर केले व शाळेच्या निकालाची पंरपरा कायम ठेवण्यासाठी प्रय त्न करनारया शिक्षक व मुख्याध्यापक यांचेही अभिनंदन केले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बनसोडे मॅडम, मिरगणे सर, मुंढे सर ,बरकडे सर,पाटील सर,दीपक पाटील सर, दळवी सर, सुधीर कदम ,महादेव लटके ,शिवाजी सिरसट , संजय धर्मे, इ व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल बरकडे सर यांनी केले तर आभार मुंढे सर यांनी मांडले.
टिप्पणी पोस्ट करा