करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचे व साठे पार्टीचे कार्यकर्ते बाहेर पडण्याची शक्यता ??
कुर्डूवाडी...
माढा तालुक्यातील जोडलेल्या छत्तीस गावातील करमाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे व माजी आमदार धनाजीराव साठे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कुर्डूवाडी येथे साठे गटाचे मार्गदर्शक ॲड.बी डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ॲड. मीनल साठे या 2024 च्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघातून जनसंवाद यात्रा त्यांची सुरू आहे या जनसंवाद यात्रेला महिलांचा शेतकऱ्यांचा व मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे. परंतु माढा विधानसभा ही जागा महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सुटण्याची चिन्हे दिसून येत आहेत परंतु या पक्षातून अनेक जण इच्छुक आहेत.
माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या छत्तीस गावात माजी आमदार धनाजीराव साठे यांचा गट प्रत्येक गावामध्ये कार्यरत आहे. या भागातील बहुतांश गावातील ग्रामपंचायतीवर साठे गटाचे वर्चस्व कायम आहे. तसेच ही गावे करमाळा मतदारसंघाला जोडल्यापासून या गावातील काँग्रेस पक्षाच्या व साठी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमदार साठे यांचा आदेश म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यात आपली भूमिका बजावलेली आहे.
परंतु आज झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या महाविकास आघाडी बद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. व त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचित केले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्या काँग्रेस पक्षाच्या साठे पार्टीच्या नेत्या माढा शहराच्या नगराध्यक्ष ॲड.मीनल साठे यांना माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मिळावी त्यादृष्टीने वरिष्ठ नेते मंडळींनी आमच्या मागणीचा विचार करावा अन्यथा माढा मतदारसंघातून जर मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही छत्तीस गावातील कार्यकर्ते करमाळा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही अशी भूमिका त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतली.
येणाऱ्या चार तारखेला माढा तालुक्यातील बिटरगाव येथे काँग्रेस पक्षाच्या व साठे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित केलेला आहे. व या मेळाव्यातून महाविकास आघाडी बद्दलची आपली भूमिका यावेळी प्रमुख नेत्यांचे उपस्थितीत जाहीर केली जाणार आहे.
चौकट..
माढा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या नेत्या व माढा शहराच्या नगराध्यक्ष ॲड.मीनल साठे यांना महाविकास आघाडीने जर माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही तर
माढा विधानसभा मतदारसंघात व करमाळा विधानसभा मतदारसंघात आमची ताकद मोठ्या प्रमाणावर असून जर महाविकास आघाडीने आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही तर महाविकास आघाडीचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आम्ही पाडणार..( काँग्रेस पक्षाचे नेते व साठे पार्टीचे मार्गदर्शक, ॲड.बी. डी.पाटील.)
यावेळी उपस्थित साठे पार्टीचे मार्गदर्शक , ॲड.बी. डी.पाटील,
संत कुर्मदास सहकारी कारखान्याचे संचालक भालचंद्र पाटील, पिंपळखुटे चे सरपंच प्रतिनिधी भैय्यासाहेब पाटील, तडवळ्याचे माजी सरपंच काकासाहेब पाटील, ढवळस चे चंद्रशेखर चव्हाण, नाडीचे धनाजी खरात, म्हैसगावचे नामदेव खारे, अंबडचे अर्जुन कदम, लव्हेचे सुभाष पाटील, मुंगशीचे माजी सरपंच बीराप्पा महाडिक, विलास पाटील, कवे रोपळे चे मुलानी, गवळेवाडी चे दत्तात्रय गवळी, जाखले चे दत्तात्रय पवार, चौबे पिंपरी चे प्रभु बनसोडे,मरिबा सुकले, दत्तू खताळ, पिंपळखुंठेचे संतोष बोराटे, विक्रम सिंह पाटील, कवेचे राजाभाऊ ताकमोगे, अकुल गावचे आनंदराव पाटील, लोणीचे अरुण भागवत, गणेश नाडकर, महादेववाडीचे सतीश मोटे इत्यादी विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व साठे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा