ॲड. मीनल साठे यांच्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील गावभेट दौऱ्यास मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा...
पंढरपूर प्रतिनिधी.... माढा विधानसभा मतदारसंघाला पंढरपूर तालुक्यातील 42 गावे जोडलेले असून या गावांमध्ये माढा शहराच्या नगराध्यक्ष ॲड मीनल साठे यांचे गाव भेट दौरे सुरू आहेत. यामध्ये काल त्यांना विविध गावांमध्ये गणेश उत्सवानिमित्त गणपती आरती करण्यासाठी आवर्जून बोलाविण्यात आले होते. यामध्ये रोपळे, आढीव ,बाभूळगाव, शेगाव दुमला, सुस्ते ,अजन्सोंड, बिटरगाव , भटुंबरे, देगाव पाटी, अशा विविध गावांमध्ये भेट दिल्यानंतर आवर्जून त्या गावातील महिला भगिनी कडून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येत होते. व प्रत्येक गावातील ग्रामस्थ गावातील बऱ्याच वर्षापासून असणारे प्रलंबित प्रश्न मांडत होते.
या गाव भेट दौऱ्यामुळे तेथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दौऱ्याच्या निमित्ताने गावाच्या विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. गावातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, शेती संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
गावातील विकासकामांच्या प्रगतीबाबत चर्चा करताना, ग्रामस्थांनी गावात अधिक पाणीपुरवठा, रस्ते सुधारणेसाठी मागणी केली. दौऱ्यामुळे गावातील लोकांना आपले मुद्दे मांडण्याची संधी या गाव भेट दौऱ्यामुळे मिळाली.
या गावभेट दौऱ्यास विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहून पाठिंबा देताना दिसत आहेत .
टिप्पणी पोस्ट करा