माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील 14 गावांमधून ॲड.मीनल साठे यांच्या जनसंवाद यात्रेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
अकलूज प्रतिनिधी... माढा विधानसभा मतदारसंघात माढा शहराच्या नगराध्यक्ष ॲड. सौ. मिनल साठे यांची संपूर्ण मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसांपासून जनसंवाद यात्रा सुरू आहे. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातू माळशिरस तालुक्यातील वाफेगाव, वाघोली, लवंग ,श्रीपुर, माळखांबी, विठ्ठलवाडी ,खळवे , जांभूड ,नेवरे या गावात ही जनसंवाद यात्रा पोहोचलेले आहे. या जनसंवाद यात्रेला शेतकरी ,मजूर ,सुशिक्षित बेरोजगार, महिला यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक गावात जनसंवाद यात्रेचे तोफा , ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. प्रत्येक गावातील महिलांच्या वतीने मीनल साठे यांचे औक्षण करून त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.
या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दररोज सकाळच्या सत्रात पाच गावे व सायंकाळ सत्रात पाच गावे असा जनसंवाद सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गावागावातील महिला ,शेतकरी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने जनसंवाद यात्रेची वाट पाहताना दिसत आहेत..
या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नगराध्यक्ष साठे लोकांना सांगत आहेत की माढा तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून माळशिरस तालुक्यात पंधरा वर्षापासून लोकप्रतिनिधींनी या तालुक्यातील पायाभूत समस्या सुद्धा सोडवलेले नाहीत. लोकप्रतिनिधींनी तालुक्यात फक्त स्वतःचे व्यवसाय वाढवण्याचे काम केले आहे.तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेने मला संधी दिली तर मी संपूर्ण विधानसभा मतदारसंघांमध्ये माढा शहराचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास केला त्याच धर्तीवर विकासाचा माढा पॅटर्न संपूर्ण मतदारसंघात राबू इच्छित आहे.
चौकट.... गेल्या पंधरा वर्षापासून माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांनी आमच्या जांभूड या गावातील लोकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकी वेळी दिलेले आहे. त्यांनी आमच्या समाजाच्या भावना जाणून बुजून दुखावण्यात आले आहेत. तरी आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रणजित शिंदे यांना गावात प्रवेश बंदी करणार आहोत. श्री. भीमराव भूषणर सामाजिक कार्यकर्ता जांभूड
टिप्पणी पोस्ट करा