ॲड.सौ .मीनल ताई साठे यांच्या जनसंवाद यात्रेस माढा तालुक्यातील पूर्व भागातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..


ॲड.सौ मीनल ताई साठे यांच्या जनसंवाद यात्रेस माढा तालुक्यातील पूर्व भागातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज माढा शहराच्या नगराध्यक्ष ॲड.सौ मीनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेची सुरुवात माढा तालुक्यातील पूर्व भागातील बुद्रुकवाडी येथून करण्यात आली. या संवाद यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे माढा शहरामध्ये केलेल्या विकास कामाचे पत्रक, डिजिटल व काँग्रेस पक्षाच्या सर्व नेतेमंडळीचे फोटो असलेले चित्ररथ हे खास आकर्षण ठरलेले दिसले .तसेच या संवाद यात्रेत 25 ते 30 गाड्यांचा ताफा चित्र रथ सोबत दिसून आला. या संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील पायाभूत  सोयी सुविधा, शेतकरी ,शेतमजूर, महिला ,बेरोजगार ,यांच्या समस्या ऐकून त्या समस्या भविष्यात सोडवण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. असे मत ॲड.सौ मीनल ताई साठे यांनी व्यक्त केले.
बुद्रुकवाडी ( मारुती मंदिर) येथे आज जनसंवाद यात्रेनिमित्त माढा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा ॲड. सौ.मीनल ताई साठे यांनी भेट दिली.
यावेळी उपस्थित श्री अमर रणपिसे , श्री माऊली पवार, श्री आबासाहेब वाघ, रोहन बुद्रुक, ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी   लोकांनी पाणी ,सार्वजनिक शौचालय, रस्ते  आरोग्य आदि विविध विषयांवर चर्चा होऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

मानेगाव येथे आज जनसंवाद यात्रेनिमित्त भेट दिली यावेळी लोकांनी समस्याचा पाढा वाचून दाखविला व काही सार्वजनिक समस्यांचा लोकांनी निवेदन देण्यात आले.
यावेळी  शुभम बेडगे ,बाबा देशमुख ,सुरज पारडे ,राजकुमार देशमुख, प्रशांत देशमुख, गजानन माने, शीतल जोकार,बाळासाहेब राऊत , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.






जनसंवाद यात्रा 
गाव भेट दौरा धानोरे 

धानोरे येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आज जनसंवाद यात्रेनिमित्त माढा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा ॲड. सौ.मीनलताई साठे यांनी भेट दिली.
यावेळी सरपंच सौ छाया धावणे,श्री  अनिल काका देशमुख भारत देशमुख, किशोर देशमुख कृष्णा नाटक, सचिन क्षिरसागर मारुती बामणे, रजनीकांत देशमुख  ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी लोकांनी धानोरे ते तडवळे हा बऱ्याच वर्षी यापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला.  विविध विषयांवर चर्चा होऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.


जनसंवाद यात्रा 
गाव भेट दौरा केवड 
ग्रामपंचायत केवड येथे आज जनसंवाद यात्रेनिमित्त माढा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा ॲड. सौ.मीनलताई साठे यांनी भेट दिली
यावेळी ॲड.समाधान लटके ,संतोष लटके ,दत्तात्रय लटके ,अतुल पिंजारी सत्यवान लटके सौ.ज्योती लटके, मुकुंद धर्मे ,हनुमंत भोकरे, आणासहेब पाटील, महादेव गायकवाड, महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी  लोकांनी सिना नदीतून कारखान्याला होणारा अवैध पाणी उपसा हा बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.विविध विषयांवर चर्चा होऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

जनसंवाद यात्रा 
गाव भेट दौरा उंदरगाव
उंदरगाव येथे आज जनसंवाद यात्रेनिमित्त माढा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा ॲड. सौ.मीनलताई साठे यांनी भेट दिली.
यावेळी शिवाजी चव्हाण  श्री शंकर नाईकवाडे , बालाजी मुजमुले, बाळासाहेब नाईकवाडे, रवी चव्हाण, दत्ता कोळी, सोनम मोटे ,किरण लवटे, गणेश पारडे ,संतोष माने, ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. 

या जनसंवाद यात्रेमध्ये गावोगावी फटाके ,तोफा यांची आतिश बाजी करत उत्साहात स्वागत करण्यात आले .या संपूर्ण सकाळच्या सत्रातील संवाद यात्रेमध्ये युवा नेते वेदांत भैया साठे, माढा शहराच्या उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे ,माढा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक सभापती विविध गावचे सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,विविध सेवा सोसायटीचे चेअरमन ,युवक मंडळाचे अध्यक्ष, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments