माढा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केवड येथील प्रा. तानाजी देवकुळे यांचा लंडन येथील जागतिक परिषदेत सहभाग..

माढा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केवड येथील प्रा. तानाजी देवकुळे यांचा लंडन येथील जागतिक परिषदेत सहभाग..
माढा: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, युके  या संस्थेत बॅरिस्टर पदवीसाठी ‘ द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इटस सोल्युशन' हा प्रबंध सादर केला होता . या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली. या ग्रंथाची दखल अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटीश सरकार यांनी १९२५ ला देशात एडवर्ड यंग यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमून अभ्यास करण्यात आला होता. त्यांनी सुचवलेल्या शिफारसीनच्या आधारे पुढे १९३५ ला आर्थिक नियंत्रणासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती.  या प्रबंधास १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लंडन येथील ग्रेज इन या संस्थेत ग्लोबल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते 
       माढा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व केवड ता. माढा येथील प्रा.तानाजी देवकुळे  यांनी लंडन येथे उपस्थित राहून आपला दलित भांडवलशाही व दलित मुक्ती: एक चिकित्सा या विषयावर शोधनिबंध सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन अनेक पदव्या संपादन केल्या, बॅरिस्टर झाले आणि एक नवा आत्मविश्वास दलितांमध्ये निर्माण केला. दलित समाजातील विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले, नोकरीमध्ये त्यांना संधी मिळू लागल्या, प्रगती होऊ लागली. आज दलीत समाज सामाजिक आणि आर्थिक उन्नयनाच्या टप्प्यावर असून त्यास जर शासन व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मदत केली तर दलित समाजातील युवक वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये व व्यापारामध्ये यशस्वी होतील, नवीन उद्योजक होऊन ते समाजातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतील. असे मत त्यांनी व्यक्त केले.
         प्रा. तानाजी देवकुळे सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील इंग्रजी विभागात कार्यरत आहेत. लंडन येथील बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटीश म्युझियम इत्यादी विविध संस्थाना भेटी दिल्या. 
     सदर परिषदेचे आयोजन सायास संस्था आणि मराठी अर्थशास्त्र परिषद इत्यादींनी केले होते. बार्टी व यशदाचे माजी  संचालक रविंद्र चव्हाण यांच्या समन्वयाने  देश विदेशातील  विविध प्रांतातून  प्राध्यापक, वकील, सेवाभावी संस्थाचे प्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी , हायकोर्टाचे व सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, बँकांचे अधिकारी इत्यादीसह भारतातील आणि जगातील विविध विद्वानांनी सहभाग घेतला होता.  
         ग्लोबल परिषदेत उपस्थित राहून शोधनिबंध सादर केल्याबद्दल,  माढा तालुक्याचे माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड.धनाजीराव साठे, नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. ॲड.मीनलताई साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, उपप्राचार्य अशोक कदम, स्टाप, सकाळचे वार्ताहर किरण चव्हाण सर यांनी प्रा. तानाजी देवकुळे यांचे अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments