श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा केवड या शाळेत शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मध्ये 100 % प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन हाउसफुल चा फलक..

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा केवड या शाळेत शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मध्ये 100 % प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन हाउसफुल चा फलक.. 

माढा प्रतिनिधी... 
           माढा तालुक्यातील केवड गावामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती ,यांच्यासाठी आश्रम शाळा असून ग्रामीण भागातील केवड आश्रम शाळेतील गुणवत्तेमुळेच ग्रामीण भागातील  आश्रम शाळेत शैक्षणिक वर्ष 2024 - 25 या वर्षांमध्ये हाउसफुल चा फलक लागला आहे. गुणवत्ता ,योगासन त्याचबरोबर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये अव्वल कामगिरी या क्षेत्रातील उल्लेखनीय व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मध्ये चार ते पाच दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून 450 पेक्षा जास्त प्रवेश विद्यार्थ्यांनी घेतल्याने शाळा व्यवस्थापनाचा हाउसफुल चा फलक कार्यालयासमोर लावलेला आहे. 2 ऑक्टोंबर 1996 रोजी केवड गावामध्ये संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण यांनी प्राथमिक आश्रम शाळेचे एक छोटसं रोपट लावलं या रोपटेने आज मोठ्या वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे. हे केवळ आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या व त्यांना दिले जाणाऱ्या गुणवत्तेमुळेच सोयीसुविधा, भोजन ,निवासाची उत्तम सोय आणि व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले. या प्रशालेत दहावी व बारावीच्या वर्गाचा शंभर टक्के निकालाची परंपरा आहे. या प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक कक्ष ,स्वतंत्र ग्रंथालय, भव्य क्रीडांगण, विद्यार्थ्यांना व्यायामासाठी आवश्यक असणारे जिमचे साहित्य उपलब्ध आहे तसेच RO चे शुद्ध पाणी पिण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. गेल्या दहा वर्षापासून योगासने, विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी चमकलेले आहेत. या आश्रम शाळेतून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, योगपटू ,इंजिनियर, कुस्ती स्पर्धेत, वकील, शिक्षक ,भारतीय सेना, पोलीस, शासकीय व निम शासकीय सेवेत या प्रशालेतील माजी विद्यार्थी कार्यरत आहेत तसेच या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाबरोबर त्यांना विविध स्पर्धा परीक्षेतील लागणाऱ्या पुस्तकाची उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ..
*शाळेच्या उल्लेखनीय बाबी..* 

पश्चिम महाराष्ट्रातील आयएसओ मानांकित पहिली आश्रम शाळा, शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक, राष्ट्रीय स्तरावर योगासन कुस्ती क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश, स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम, शिवजन्मोत्सव सोहळा, रक्तदान शिबिर, आर्ट ऑफ लिविंग अंतर्गत बाल चेतना शिबिर ,माजी विद्यार्थी मेळावा, करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन, मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादी स्थान. 
*पालकांची प्रतिक्रिया..* 

माझा पाल्य या आश्रम शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकत असून त्याने मंथन परीक्षेमध्ये उत्तम प्रकारे राज्यस्तरीय परीक्षेत पहिल्या क्रमांकांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. चांगल्या व दर्जेदार शिक्षण या आश्रम शाळेत मिळते म्हणूनच हे शक्य झाले आहे.. 

—-ॲड.समाधान लटके.पालक 

माझ्या मुलीला चित्रकलेची आवड असल्याने तिला या प्रशालेत विविध स्पर्धेमध्ये तिला सहभागी केले.  तिला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन व करिअर व्याख्यानमालेचा फायदा झाला.

——पालक राजेंद्र धर्मे . 
*चौकट १*
या आश्रम शाळेसाठी संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण सर शाळेचे व्यवस्थापक कालिदास चव्हाण सर यांचे मोलाचे सहकार्य असून त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांच्यासह प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी यांची चांगली साथ त्यांना लाभलेले आहे. केवड आश्रमशाळेचे संस्थापक सचिव, समाजभूषण मा.महारूद्र मामा चव्हाण, संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या मदतीने आम्ही वाटचाल करीत आहोत. आश्रमशाळेतील विद्यार्थी हेच दैवत मानून आम्ही काम करीत आहोत. यामुळेच प्रशालेतील अनेक विद्यार्थी आज डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, योगशिक्षक, शिक्षक, फार्मसी,राजकीय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आज सातत्याने संपूर्ण प्रवेश पूर्ण होणे ही आम्ही करीत असलेल्या कामाची पोचपावती आहे.
       —— नरसेश्वर पाटील मुख्याद्यापक 
*चौकट २*
आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांना निपुण भारत उपक्रम अंतर्गत देण्यात आलेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. बदलत्या काळानुसार बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्याना देण्यात येत असलेल्या सुविधा व आवश्यक साहित्य यांचादेखील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. केवड आश्रमशाळेतील संस्थापक मा.महारूद्र मामा चव्हाण, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आश्रमशाळा नावारूपास आणली आहे. टीमवर्क व दर्जेदार शिक्षण हेच त्यांचे प्रवेश पूर्ण होण्याचे प्रमुख कारण आहे. या शाळेचा आदर्श जिल्ह्यातील इतर आश्रम शाळांनी घ्यावा.
       — श्रीमती मनीषा फुले
सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर

0/Post a Comment/Comments