माढा पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविणार- नगराध्यक्षा ॲड.सौ.मीनलताई साठे

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान वडाचीवाडी (अं. ऊ) अंजनगाव उमाटे, दारफळ, सुलतानपूर ,वडशिंगे कॉर्नर  सभेत ॲड.मीनल ताई साठे बोलत असताना माढा पूर्व भागातील पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या वडाचीवाडी, अंजनगाव उमाटे , जामगाव या गावातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आपण निवडणुकीत जर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील निवडून आल्यास स्वतः लक्ष घालून या भागातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा असणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा शब्द ॲड. मीनल ताई साठे यांनी बोलताना दिला .त्यासोबत आगामी काळात महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी भविष्यकाळात प्रयत्न करणार आहे. या तालुक्यातील प्रस्थापित नेतृत्वाने जाणीवपूर्वक माढा पूर्व भागाकडे दुर्लक्ष केले असून त्यांची विकास कामे करण्याची  मानसिकता नाही. त्यांनी स्वतःचे उद्योग उभारन्या पलीकडे जनतेच्या प्रश्नावर डोळेझाक करण्याचा काम आजपर्यंत केला आहे परंतु येणाऱ्या काळात हा तालुका विकासासाठी मी दत्तक घेत असून 24 तास तुमच्या सेवेसाठी मी प्रयत्न करणार आहे. तरी या लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आव्हान जनतेला केले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराजे जगताप यांनी बोलताना वडाचीवाडी ,अंजनगाव उमाटे ,जामगाव या गावातील समस्यांचा पाढा वाचून दाखवत त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भविष्य काळामध्ये काम केले जाणार असून भविष्यातील सर्व निवडणुका विद्यमान आमदारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून साठे गट ताकतीने लढवणार असल्याचे प्रतिपादन केले. माढा पूर्व भागातील दौऱ्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून महिलांनी मिनलताई साठे यांनी आमदारकीचे निवडणूक लढवावी अशी विनंती प्रियदर्शनी महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ श्रीदेवी शाहूराजे जगताप यांनी केली. या गाव भेट प्रचार दौऱ्यामध्ये यांच्यासोबत माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे उपस्थित होत्या.  यावेळी वडाचीवाडी येथील महिला व युवकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता. गाव भेट दौऱ्यामध्ये अंजनगाव येथे संत कुर्मदास चे संचालक शिराज शेख , उपसरपंच विजयकांत उमाटे, शिवाजी मुळे, संदीप उमाटे, अरुण माने , दारफळ येथील हौसाजी पाटील,औदुंबर उबाळे सिद्धेश्वर भिंगे, सुलतानपूर येथील बालाजी साळुंखे, अर्जुन शिंदे नाना साळुंखे, वडशिंगे येथील माजी सरपंच रोहिदास बाप्पा कदम, सोसायटी चेअरमन प्रतापसिंह कदम, विकास डूचाल, बालाजी शिंदे ,गणेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य अमोल मिस्किन यांच्यासह सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments