माढा व माढा परिसरातील पूर्व भागाचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक विकास केला नाही... नगरअध्यक्षा ॲड.सौ.मिनलताई साठे.

      माढा प्रतिनिधी.. माढा लोकसभाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ॲड.सौ.मीनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली माढा शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये होम टू होम प्रमुख पदाधिकारी व सर्व नगरसेवकांच्या उपस्थित रॅली काढण्यात आली. मानेगाव जिल्हा परिषद गटातील वाकाव केवड ,उंदरगाव, मानेगाव, कापसेवाडी, बुद्रुकवाडी येथील गावांचा गावभेट दौरा करण्यात आला. या पूर्व भागातील दौऱ्याची सुरुवात धानोरे येथील अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाने करण्यात आली. या गावभेट दौऱ्यातील कॉर्नर सभेमध्ये मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष साठे म्हणाल्या की आपल्या देशामध्ये लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवायचे असेल तर आपण  या लोकसभा निवडणुकीमध्ये या देशातून भाजपा सरकार हद्दपार केले पाहिजे. आपल्या माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना सामाजिक, राजकीय वारसा त्यांचे आजोबा सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा लाभलेला असून त्यांनी ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा विविध पदाच्या माध्यमातून लोककल्याणकारी कामे केली आहेत. या सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार महर्षी गणपतराव साठे व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकार क्षेत्रात भरीव योगदान केलेले आहे. पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून देणे गरजेचे आहे. आपण या अगोदर निवडून दिलेला खासदार  यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये माढा व माढा परिसरातील गावांमध्ये कोणतेही ठोस काम यांच्या माध्यमातून झालेले नाही .माढा पूर्व भागातील रेल्वे गेट येथे उड्डाणपूल किंवा भुयार मार्ग हा माढा परिसरातील जवळजवळ वीस ते पंचवीस ग्रामपंचायतीने ठराव करून या कामाची मागणी या अगोदरच्या खासदारांकडे केलेली होती. तसेच माढा रेल्वे स्टेशनला पुणे मुंबईला जाणाऱ्या रेल्वे थांबण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु जाणून-बुजून खासदारांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य जनतेची गैरसोय केलेली आहे. या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावातील सर्वसामान्य लोकांनी ,शेतकऱ्यांनी आपल्या अडीअडचणी ॲड.साठे यांना बोलून दाखवल्या. दौऱ्यामध्ये प्रत्येक गावातील लोकांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग व पाठिंबा देत आगामी विधानसभा निवडणूक मीनल ताईंनी लढावी असा आग्रह महिलांनी व  गावो गावच्या ग्रामस्थांनी केला.  महाविकास आघाडीची उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन नगराध्यक्ष साठे यांनी  केले . या दौऱ्यामध्ये मोहिते पाटलांचे समर्थक शिवामृतचे संचालक बाळासाहेब पराडे पाटील व त्यांचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. बुद्रुकवाडी येथील सरपंच पूजा माने, पाणलोट समितीचे सचिव अमोल रणपिसे, रंजनाताई दळवी, यडप्पा पवार, सत्यवान उदांगे, व गावातील ग्रामस्थ व महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कापसेवाडी येथे युवा नेते सचिन कापसे , कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन बापू कापसे व गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य शितल जोकार,महिला बचत गटाच्या मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रमोदिनी लांडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बाळासाहेब राऊत व गावातील ग्रामस्थ, महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. केवड येथे कॉर्नर सभेसाठी केवड ग्रामपंचायतीचे  माजी उपसरपंच दत्तात्रय लटके माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ वगरे, विविध सेवा सोसायटीचे माजी संचालक अण्णासाहेब पाटील, दादासाहेब साठे युवा मंचचे अध्यक्ष संतोष लटके हनुमंत भोकरे,महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ ज्योती लटके सचिव रोहिणी पिंजारी, सदस्य राधा पिंजारी ,महिला बचत गटाच्या सीआरपी सरस्वती लटके, प्रमिला राऊत ,गावातील ग्रामस्थ व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उंदरगाव येथील कॉर्नर सभेसाठी अमोल चव्हाण सर नेताजी मुजमुले, बाळासाहेब नाईकवाडे, खेलू नाईकवाडे दत्ताभाऊ कोळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वाकाव येथे ग्रामपंचायत सदस्य मानकोजी भुसारे, भारत खंडागळे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रचार दौऱ्याचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड.समाधान लटके जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शाहूराजे जगताप ,उंदरगाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी मुजमुले यांनी यशस्वी केले.

0/Post a Comment/Comments