पुढचं पाऊल हे पुस्तक मराठा समाजाला दिशा देणारे ... डॉ. जयंत करंदीकर

प्रतिनिधी | कुर्डुवाडी... पुढचं पाऊल हे पुस्तक मराठा समाजाला दिशा देणारे... डॉ. जयंत करंदीकर
स्व अण्णासाहेब पाटील यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे लिखित पुढचं पाऊल पुस्तकाचे कुर्डूवाडीत आयोजित कार्यक्रमांमध्ये वितरण करण्यात आले.

शनिवारी भोसरे येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये मराठा महासंघाच्या आयोजित कार्यक्रमांमध्ये पुढचं पाऊल पुस्तकाच्या 500 प्रतिचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प. अनंतराज बाबा पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर ह.भ. प. डॉ. जयंत करंदीकर यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक वितरण करण्यात आले.
        पुढचं पाऊल पुस्तक मराठा समाजाला दिशा देणारे असून याचे वाचन प्रत्येकाने करावं असे आवाहन डॉ. जयंत करंदीकर यांनी भाषणातून केले. वाचनाची गोडी निर्माण करणारे आहे पुस्तकं वितरणाचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
               यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप भोरे,सचिव गणेश चव्हाण, डॉ.जयंत करंदीकर, तालुकाध्यक्ष धनाजी गोडसे, शिक्षक संघाचे नूतन तालुकाध्यक्ष राजेंद्र गुंड,अरविंद पवार,सूरज गव्हाणे, विजयकुमार आडकर,शंकर बागल,देवीदास सुरवसे,धर्मराज भोरे,सचिन बागल,अनंतराज पातूरकर,हरिदास बागल, मुनीराज भोरे,बालाजी बागल,दिपक शिंदे,शिवाजी भोरे,विवेक मराळ,अशोक भोरे, नितीन कुंभार,डॉ.तृप्ती भोरे,ज्योती भोरे,सीमा भोरे,तृप्ती आडकर,शैला भोरे, श्रृती भोरे, शंकर कदम, बंडू काळे, काका चव्हाण, वैभव देशमुख, सुनील पारखे, राहूल शिंदे, मधूकर भोरे, जयंत भोरे यांच्यासह मराठा महासंघाचे सदस्य व महिला उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments