बोगस खत कंपनीवर कारवाई करा... प्रहार जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे

 बोगस खत कंपनीवर कारवाई करा... प्रहार जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे

 माढा प्रतिनिधी..जयकिसान अग्रो टेक इंडिया प्रा.लिमिटेड या नावाने संपूर्ण महाराष्ट्राभर खत विक्री होत आहे. सदर कंपनी ही गोव्याची नसून औरंगाबाद ची आहे. मात्र शेतकऱ्यांना जय किसान या ओरिजनल नावाने सरास दुकानदार आणि कंपनी खत विकरी करत दिशाभूल करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. सदरील कंपनीचे खत हे बोगस असून कंपनी खत दुकानदारांना जास्तीचा नफा देण्याचे आणि अनेक आमिशाना बळी पाडून दुकानदारांना खत विक्रीस भाग पाडत आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि उत्पादनावर होत आहे.
आम्ही या कंपनीचे खत सँपल प्रायव्हेट लॅब मध्ये चेक केले आहे. तरी त्या कंपनीच्या वॉटर सोल्युबल मध्ये फक्त युरिया चे प्रमाण दिसून आले आहे. तसेच 19:19:19, 12:61:00, 00:00:50 हेही चेक केले असता सगळे सँपल फेल गेले आहे.तसेच सुपर मध्ये झिंक +बोरॉन चे प्रमाण नाही. तसेच सुपर सुद्धा 16% नाही. त्यामधे माती आणि फरशी चे तुकडे आढळून आले आहेत. ऊस स्पेशल ही फेल गेले आहे. तरी या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच अन्यथा प्रहार शेतकरी संघटना आपल्या कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करेल. अशा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी दिला आहे. त्या प्रसंगी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी संतोष कोळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments