चित्रकार रत्नदिप बारबोले यांना रबिंद्र रत्न भारत सेवा पुरस्कार जाहीर
माढा प्रतिनिधी...व्येईल फाऊंडेशन आणि रवींद्रनाथ टागोर फाऊंडेशन बेंगलोर, कर्नाटक राज्य यांच्या मार्फत रबिंद्र रत्न हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दिला जातो.कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदिप बारबोले यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.हा पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाची प्रतिष्ठा आणि ओळख मानला जातो.
माढा तालुक्यातील दारफळ हे सीना नदीवर वसलेले एक समाजवादी आणि पुरोगामी विचारसरणीचे गाव.दारफळ सारख्या ग्रामीण भागात राहून चित्रकार रत्नदिप यांनी अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घातली आहे. लंडन,अमेरिका,दुबई आशा देशातून रत्नदीपच्या तैलचित्रांना मागणी आहे.बांधावरच्या तरुणाचा कुंचला अनेक संकटातून उभारी घेत जगभर यशस्वी होतोय.रत्नदीप चे हे यश कौतुकास्पद आहे. लंडन,दुबई,रशिया, अमेरिका मधील अनेक पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात ही सहभाग घेऊन पारितोषिक मिळवली आहेत. आज याच कार्याची दखल घेत कर्नाटकातील रवींद्रनाथ टागोर फाऊंडेशन आणि व्येईल फाऊंडेशन यांच्या कडून दिला जाणारा रबिंद्र रत्न भारत सेवा पुरस्कार रत्नदिप यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील असून कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल चित्रकार रत्नदिप बारबोले यांना जाहीर केला आहे.
रत्नदीप बारबोले : रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाने दिला जाणारा रबिंद्र रत्न पुरस्कार मिळाल्याने खूप आनंदी आहे.आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक कामाची दखल आज राष्ट्रीय स्तरावर घेतली जातेय हे माझ्यासाठी खुप मोठ यश आहे. माझ्या कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व कलारसिंकांचे मनापासून आभार.
टिप्पणी पोस्ट करा