विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी माहिती पेक्षा ज्ञान महत्वाचे जागतिक स्तरावरील चित्रकार मा.श्री.रत्नदिप बारबोले
माढा : कोणत्याही विद्यार्थ्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी माहिती पेक्षा ज्ञान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जागतिक स्तरावरील चित्रकार मा.श्री.रत्नदिप बारबोले यांनी व्यक्त केले.
केवड ता. माढा येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित, माध्यमिक आश्रम शाळा केवड ता. माढा यांच्या वतीने कलाजगत व कलाकरिअर यासाठी व्याख्यानमाला व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक स्तरावरील चित्रकार मा.श्री.रत्नदिप बारबोले यांना आमंत्रित केले होते. याविषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नरसेस्वर पाटील हे होते. यावेळी कार्यवाह कालिदास चव्हाण, प्राथमिकचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणाबरोबर आई-वडील, शिक्षक व समाजातील घटक महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यासाठी उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या महापुरुषांची पुस्तके, आत्यचरित्रे यांचे वाचन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी व अभ्यासामधील सातत्य ठेवणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माहिती मिळविण्यासाठी करायचा की ज्ञान मिळविण्यासाठी करायचा याचा विचार केला पाहिजे. शिकून काय उपयोग हा विचार विद्यार्थ्यांनी मनातून काढलापाहिजे. कौशल्यावर आधारित रोजगारभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.
कालिदास चव्हाण म्हणाले की, आवड असलेल्या क्षेत्रातच विद्यार्थ्यांनी करियर निवडले पाहिजे. बदलत्या माहिती
तंत्रज्ञानाच्या काळात माहिती आणि ज्ञान ओळखता आले पाहिजे. मुख्याध्यापक नरसेस्वर पाटील म्हणाले की, शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाची, संस्काराची शिदोरी देत असतात त्यावरच त्यांनी आपले व्यक्तिमत्व घडवायचे असते. नोकरी मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य तेच शिक्षण घेणे आवश्यक आहे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशाळेचे शिक्षक प्रकाश जाधव यांनी केले त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकातून जागतिक पातळीवर चित्रकार रत्नदीप बारबोले यांनी शिक्षण घेत असताना त्यांच्या घरची परिस्थिती व त्या परिस्थितीवर मात करत आज जागतिक पातळीवर चित्रकार म्हणून ओळख याबरोबरच त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले पुरस्कार याबद्दल त्यांनी रत्नदीप बारबोले यांच्या जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृष्णा घाडगे यांनी केले या व्याख्यानमाला व कार्यशाळेसाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा