माढा परिसरात वाळू व मुरूम चोरांचा सुळसुळाट
माढा प्रतिनिधी.. माढा परिसरात मुरूम चोरांचा सुळसुळाट... माढा परिसरातील अवैधरित्या गौणखणीज चोरून विक्री केले बाबत माढा येथील सामाजिक कार्यकर्ते किरण करमचंद पवार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे .त्यांनी या तक्रारीत नमूद केले आहे की ,माढा येथे रयत शिक्षण संस्थेची जमीन असून सदर जमिनीमधून राजे रोस पणे अवैद्य रित्या उत्खनन करून चोरून 1000 ब्रास मुरूम चोरीला गेला आहे .व अशाच प्रकारे गालिशबाबा दर्गा येथील तळ्यातून रात्री अप रात्री मुरुम उत्खनन करून मुरूम चोरला जात आहे .गौण खनिजाबद्दल जबाबदारी असलेले महसूल खाते या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. माढा शहरा शेजारील परिसरातील सिना नदीमधील ओढा, बेंद यामधून दिवसाढवळ्या वाळू 7000 ब्रास दराने वाळू विक्री केली जात आहे. सदरच्या गौण खनिजाच्या चोरीबाबत माढा महसूल खाते व माढा महसूल चे कर्मचारी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून वाळूमाफिया यांना पाठिंबा देत आहेत .सदर गौण खनिज तक्रारीचा गांभीर्याने विचार करून सदरची व्यवस्थितरित्या चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.माढा तालुका मातंग परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी दिलेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा