प्रजासत्ताक दिनी सुवर्ण कृषी राष्ट्र निर्माण शुभारंभ प्रसंगी दृष्टीहीन युवा शेतकरी यास 89पोलीस उपनिरीक्षक बैच ने घेतले दत्तक.
भारत कृषिरत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विज्ञान संत यांनी व त्यांच्या कृषी शास्त्रज्ञ टीम ने ११ वर्ष संशोधन व प्रत्यक्ष शेती करुन ६८ फळ पिके यांचे अल्प खर्च कृषी तंत्रज्ञान विकसित केले आहे या तंत्रज्ञानामुळे कृषी प्रधान देशाची जमीन जल भारतीय चलन व पर्यावरण संवर्धन द्वारा " राष्ट्र निर्माण " होईल असा विश्वास डौक्टर विजय भटकर यांना व त्यांच्या कृषी वैज्ञानिक शास्त्रज्ञ टीम ला आहे या कृषी इनोव्हेटिव्ह कृषी टीम मधे जामगाव तालुका माढा येथील श्री मालोजी चव्हाण द्राक्ष व ऊस उत्पादक शेतकरी देखील आहे. सुवर्ण कृषी तंत्रज्ञान पद्धती मधे रिवुलीस मन्ना जलव्यवस्थापन व पी आय बी - टेन, चार ड्रम खत व्यवस्थापन द्वारा अतिशय अल्प खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले आहे असा हा एकरी शंभर टन ऊस उत्पादन प्रकल्प बार्शी माढा लातुर पंढरपूर येथे राबविण्यासाठी आज श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी संचलित सुवर्ण कृषी राष्ट्र निर्माण आश्रम शुभारंभ झाला. शुभारंभ प्रसंगी दृष्टीहिन युवा ऊस उत्पादक शेतकरी श्री मालोजी चव्हाण यांस महाराष्ट्र पोलिस दल 89 पोलीस उप निरीक्षक बैच ने दत्तक घेतले असुन आज त्याला दोन एकर साठी रिवुलीस ड्रिप इरिगेशन संच डॉ बी वाय यादव अध्यक्ष शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन श्री नानासाहेब कदम सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व व्यवस्थापक सुवर्ण कृषी राष्ट्र निर्माण आश्रम व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड ता. माढा यांनी केले आहे तर श्री संजय पांडे व त्यांच्या उपनिरीक्षक बैचने आर्थिक सहकार्य केले आहे हे ऐकुन उपस्थित महिला व पुरुष यांनी वर्दीतील माणुसकीला आनंदाश्रु ने वाट करून दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुवर्ण कृषी राष्ट्र निर्माण शुभारंभ अतिथी माननीय श्री डॉक्टर बी वाय यादव अध्यक्ष शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांचा सन्मान करताना सुवर्ण कृषी राष्ट्र निर्माण प्रकल्प संस्थापक सदस्य श्री गणेश चव्हाण केवड यांनी केला.
टिप्पणी पोस्ट करा