वडशिंगे विद्यालयाचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश 💐 आठ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड ...
वडशिंगे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील खेळाडूंनी 29 व 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेत विद्यालयातील आठ खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवला व त्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली तर तीन खेळाडूंनी द्वितीय क्रमांक व सात खेळाडूंनी तृतीय क्रमांक मिळवला यामध्ये
**14 वर्षाखालील वयोगट ** (1) सागर सचिन ठोंबरे -35 किलो वजन गट- प्रथम
(2) तुषार रोहिदास चव्हाण- 45 किलो वजन गट- प्रथम
(3) मेघा सतीश तरंगे -27 किलो वजन गट -प्रथम
(4) धनश्री सुधीर व्यवहारे -36 किलो वजन गट -प्रथम
(5)श्रावणी गोवर्धन कदम -40 किलो वजन गट- प्रथम
**17 वर्षाखालील वयोगट **
(1) प्रवीण प्रकाश धडे 50 किलो वजन गट -प्रथम
(2) समृद्धी संजय तरंगे 48 किलो वजन गट -प्रथम
(3) विद्या नागनाथ तरंगे 63 किलो वजन गट -प्रथम
तसेच अनुष्का तरंगे , शिवानी बोरकर , प्रतीक्षा शिंदे यांनी आपापल्या वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवले आणि
बिरुदेव खांडेकर, सानिध्य शिंदे, सार्थक नवले, अशोक ठवरे, आदर्श गुडेकर , निकिता ठवरे आणि हर्षदा शिंदे यांनी आपापल्या वजन गटात तृतीय क्रमांक मिळवले . या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक मा.आ.श्री. धनाजीराव (तात्या) साठे, अध्यक्ष मा.श्री.दादासाहेब साठे संस्थेच्या सचिव मा.सौ.मिनलताई साठे (नगराध्यक्षा - नगरपंचायत माढा ),विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.विजय साठे सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा