महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी केवड च्या पैलवान अनुदान अनिल चव्हाण यांची निवड
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी झाली केवडच्या पैलवान अनुदान अनिल चव्हाण ची झाली निवड.... माढा प्रतिनिधी... माढा तालुक्यातील केवड येथील पैलवान अनुदान अनिल चव्हाण यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी नुकतीच निवड झालेली आहे. पैलवान अनुदान चव्हाण हा पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून कुस्ती स्पर्धेचा सराव करत आहे .वस्ताद काका पवार, गोविंद पवार, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत राज्यभरातल्या शालेय ,विभागीय, राज्यस्तरीय, वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी यश संपादन केलेले आहे . या अगोदर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभ हस्ते विविध पारितोषिक संपादन केलेले आहेत. या अगोदर त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातारा ,जालना या ठिकाणी 2020 21 च्या पार पडल्या होत्या या स्पर्धेमध्ये त्यांनी तृतीय क्रमांक मिळवला होता. तसेच भैरवनाथ केसरी ,काळभैरवनाथ केसरी अशा नामवंत नावाजलेल्या स्पर्धेमध्ये तो गदेचा मानकरी झालेला आहे. त्याच्या कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारचे कुस्ती खेळामध्ये कोणीही नव्हते परंतु वडील अनिल चव्हाण हे व्यवसायाच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांनी आपले बीएपर्यंत शिक्षण पुणे या ठिकाणी पूर्ण करून शालेय जीवनापासूनच त्याला कुस्तीची आवड असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती या स्पर्धेमध्ये आतापर्यंत यश मिळवलेले आहे. यामुळे त्याच्या मूळ गावी केवड या ठिकाणी सर्वत्र त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा