केवड आश्रम शाळेत अनोख्या उपक्रमाने समता पर्वला सुरुवात...

केवड आश्रम शाळेत समता पर्वला सुरुवात .....
     श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन साजरा करून 26 नोव्हेंबर ते सहा डिसेंबर हा सप्ताह समता पर्व म्हणून सादर करण्याच्या सूचना इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय दिल्याप्रमाणे केवड आश्रम शाळेमध्ये समता पर्वला सुरुवात झाली आहे  .                                                                हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक 7.00 वाजता केवड गावामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे घोषवाक्य तयार करून संत रॅलीचे गावातून आयोजन केले होते त्यानंतर संविधानाची माहिती सांगणारे बॅनर घेऊन जनजागृती करण्यात आली समता रॅली पूर्ण झाल्यानंतर ठीक सकाळी 10.00 वाजता संविधान वाचन करण्यात आले त्याचबरोबर 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली संविधानाचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी जिल्हा परिषदचे शिक्षक मुख्याध्यापक मा. श्री. विनोद परिचारक सर यांनी संविधानासंबंधी अचूक माहिती विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जन्मापासून ते शेवटपर्यंतचा प्रवास नेमका कसा केला याचेही उत्तम मार्गदर्शन केले तसेच उत्तुंग यश संपादन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जीवनात आलेल्या अडीअडचणी वरती त्यांनी कशी मात केली याचेही सविस्तर मार्गदर्शन केले.
      तसेच या समता पर्वामध्ये 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाने या समता पर्वा चे आयोजन प्रशालेने मोठ्या दिमाखात केलेले आहे त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत समता पर्वाचा समारोप हा 06 डिसेंबर रोजी होणार आहे.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री गणेश चव्हाण सर कालिदास चव्हाण सर प्राथमिक चे मुख्याध्यापक विनायक लोखंडे सर माध्यमिक चे मुख्याध्यापक  नरसेश्वर पाटील सर तसेच केवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशांत प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

0/Post a Comment/Comments