आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्याबद्दल माढा तालुक्याचे मा.आ.श्री.धनाजीराव तात्या साठे, मित्रप्रेम हॉस्पिटलचे सचिव .श्री.दादासाहेब साठे ,माढा नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मा.सौ.मिनलताई साठे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या .हा पुरस्कार मिळाल्यामुळें सर्वसामान्य नागरिक व रुग्ण यांच्या कडून डॉ मस्के यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
मित्रप्रेम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विकास मस्के आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित.
माढा ...बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या वतीने आरोग्य, शिक्षण, सामाजिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट, गोवा, कर्नाटक राज्यातून व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये माढा तालुक्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे प्रतिष्ठान संचलित मित्रप्रेम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विकास मस्के यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात माढा सारख्या ग्रामीण भागात कोणतीही चांगली वैदयकीय सोय नसताना माजी आमदार धनाजीराव साठे यांनी सहकार महर्षी गणपतराव साठे प्रतिष्ठान मार्फत मित्रप्रेम हॉस्पिटल सुरु केले व त्या मध्ये डॉ विकास मस्के यांनी वैदयकीय अधिक्षक म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. त्या कोरोना काळात हजारो रुग्णास जीवदान देणारे माढा तालुक्यातील एकमेव डॅाक्टर ठरले . तसेच या हॉस्पिटलच्या माध्यमातुन महात्मा फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या माध्यमातुन शेकडो रुग्णास मोफत उपचार देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत.डॉ विकास मस्के हे या हॉस्पिटलच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील लोकांचे देवदुत बनले आहेत. अशा त्याच्या महान कार्याब्द्द्ल हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मा.विरप्पा मोइलीं (मा.मुख्यमंत्री.कर्नाटक सरकार..मा.केंद्रीय कायदा मंत्री..भारत सरकार)..मा.लक्ष्मीकांत पार्सेकर..(मा.मुख्यमंत्री..गोवा सरकार)..श्रीमती रत्नमला सावनुर (मा.केंद्रीय मंत्री.दिल्ली भारत सरकार)..मा.श्री.निलेश लंके(आमदार.पारनेर अहमदनगर)मा.श्री..आनंदराव आडसुळ(मा.खाजदार..बुलढाणा).मा.श्री..राजु शिंगाडे साहेब..(मा.महापौर..कोल्हापुर महानगरपालिका...)मा.श्री.अमरसिंह पाटील..(मा.खासदार बेळगाव)..मा.महेश मेघ्घणार..(एस.पी..गुलबर्गा..) या सर्वांच्या उपस्थित हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा