हिवरे येथील शेतकऱ्याची दोन्ही मुले झाली वकील

हिवरे तालुका करमाळा येथील मच्छिंद्र फरतडे या शेतकऱ्याची दोन्ही मुले वकील झाली आहेत. मोठा मुलगा सागर  फरतडे हा गेल्या वर्षी विधी शिक्षण पूर्ण करून सध्या बार्शी कोर्टात सराव करीत आहे . तर या वर्षी त्यांचा छोटा मुलगा तानाजी फरतडे हा नुकताच बार्शी येथील राजर्षी शाहू लॉ  कॉलेज येथून विधी शिक्षण पूर्ण केले आहे .कालच महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ऍड.मिलिंद थोबडे साहेब यांच्या हस्ते सनद प्रदान करण्यात आली. या अगोदर फरतडे कुटूंबात कोणीही उच्च शिक्षित नव्हते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या दोघांनी शिक्षण पूर्ण केले आहे. करमाळा तालुक्यातून प्रथमच एकाच कुटूंबातील दोन्ही मुले वकील झाली आहेत .  त्यांना हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांचे नेरले ता.करमाळा येथील  मामा श्री. बाळासाहेब भोसले हे शिक्षक असल्यामुळें त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. ऍड.प्रशांत एडके यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

0/Post a Comment/Comments