तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.लाल बहादुर शास्त्रीजी यांची जयंती उत्साहात संपन्न झाली...कार्यक्रमाचे उद्घाटन माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय बबनराव शिंदे यांनी केले तर अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय बळीराम काका साठे होते. प्रमुख अतिथी मा श्री दादासाहेब साठे होते.आश्रम शाळेतील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वास्तव अडचणी त्यांचे भटकंती जीवन यावर बबनदादांनी मनोगत व्यक्त केले यावर शासन स्तरावर यापुढेही भरीव कार्य केले जाईल व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बळीराम काका साठे यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रकाश टाकला खरी गरज ही आश्रम शाळेतील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची असल्याचे मत व्यक्त केले.वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
शालेय मंत्रिमंडळ प्रतिनिधींना शालेय साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले.आपल्या अविरत परिश्रमातून उभारलेली संस्था आज 500 विद्यार्थ्यांसह विशालकाय झालीआहे असे गौरव उद्गार दादांनी व्यक्त केले.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष मा महारुद्र मामा चव्हाण यांचा 65 वाढदिवस साजरा केला गेला.....
तसेच मामांच्या वाढदिवसानिमित्त प्रशाला वरती रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले 55 रक्तदात्यांनी आपले रक्तदान देऊन सहकार्य केले व त्यांना पाणी जार हा भेट म्हणून देण्यात आला....यावेळी सूत्रसंचालन मा श्री प्रकाश जाधव सर यांनी केले तर प्रास्ताविकपर मनोगत सुहास जोशी सर यांनी व्यक्त केले
कार्यक्रमास मा. सुहास काका पाटील जामगावकर...माढा पोलीस स्टेशनचे एपीआय श्याम बुवा साहेब....जगदाळे फाऊंडेशन अध्यक्ष मा..शिवाजी अण्णा जगदाळे...सुनील धर्मे... राजेंद्र पाटील शहाजी नाना चवरे.. अमोल चवरे.. हरिभाऊ घाडगे...माध्यमिकचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील व प्राथमिकचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे यांनी केले...श्री कालिदास चव्हाण ...गणेश चव्हाण सर .. युवराज जगदाळे सर...लक्ष्मण कदम सर ...नितीन सलगर सर ...सयाजी चौगुले सर....यांनी कार्यक्रमासाठी अमूल्य वेळ देऊन सर्वतोपरी सहकार्य केले.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले.
एकच नंबर
उत्तर द्याहटवाजबरदस्त
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा