महाराष्ट्र बिजनेस अवार्ड पुरस्कार सोलापूर जिल्ह्यात प्रथमच उद्योजक गणेश चव्हाण यांना जाहीर

केवड गावचे उद्योजक गणेश महारूद्र चव्हाण यांना महाराष्ट्र बिजनेस अवार्ड पुरस्काराने सन्मानित*


*माढा तालुक्यातील केवड येथील गंधर्व ऑईल इंडस्ट्रीजचा GMC लाकडी घाणा तेलाचे सीईओ तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सचिव यांना रिसील इन इंडिया यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2022 जाहीर झाला असून 06 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे या पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे*

*गणेश चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यातील पहिला लाकडी घाण्यावरच्या तेल उत्पादनाचा गंधर्व ऑइल इंडस्ट्रीज केवड येथे प्रयोग  यशस्वी केला असून...या लाकडी तेल घान्यास आयएसओ मानांकन मिळाले आहे... या घाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या तेलबियाच्या उत्पादनाला योग्य तो भाव मिळून एक हक्काची बाजारपेठ गणेश चव्हाण यांच्या प्रयोगातून उपलब्ध झाली आहे . त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना तेलबिया सारख्या आर्थिक उत्पन्न देणाऱ्या शेती पिकाची उत्पन्न घेण्याची संधी मिळाली वास्तविक पाहता भारतामध्ये लहान वयांमध्ये हृदयरोग रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे व याला प्रमुख कारण हे आपण खात असलेलं खाद्यतेल आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कमी कोलेस्ट्रॉल निर्माण करणारे व ते नियंत्रित ठेवणारे तेल वापरणे गरजेचे आहे याविषयी सखोल अभ्यास करून गणेश चव्हाण यांनी लाकडी घाण्याचे तेल लोकांसाठी उपलब्ध करून दिले यामध्ये प्रामुख्याने शेंगदाणा करडई तीळ जवस मोहरी खोबरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाची निर्मिती या ठिकाणी केली जाते व लोकांच्या आरोग्यासाठी या पद्धतीचे तेल कसे आवश्यक आहे याचे प्रबोधन केले जाते 
भारत कृषिरत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर  की जे भारतामध्ये आरोग्यपूर्ण आहार व केमिकल विरहित जीवनशैली शेती याचे प्रणेते आहेत अशा थोर वैज्ञानिकांच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर गंधर्व ऑइल इंडस्ट्री चे तेल खरे उतरले त्यामुळे नारायण धाम पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर भटकर सरांनी गणेश चव्हाण यांचा येतोचित सन्मान सोहळा पार पडला....या सर्व बाबींची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. विशेष बाब म्हणजे या पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून 60 लोकांची निवड झाली आहे सोलापूर जिल्ह्यातून ऑइल इंडस्ट्रीज (लाकडी घाणा तेल उत्पादक) क्षेत्रामध्ये गणेश चव्हाण यांची एकमेव निवड झाली आहे..                                    सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे*.

0/Post a Comment/Comments