आज केवड ता. माढा येथे माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. बबनदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केवड चे उपसरपंच अमोल लटके यांचे मार्फत विद्यार्थ्यांना भाषणे, थोर महापुरुष, सुविचार, अशा प्रकारची पुस्तके वाटप करून अनोखा उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध कार्यकारी सोसायटी चे सचिव रवीकांत चव्हाण, मुख्याध्यापक भोईटे गुरुजी, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली.
वाढदिवसाच्या निमित्त शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे जाधव गुरुजी यांनी नमुद केले .विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रविकांत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. या उपक्रमाचे शिक्षण प्रेमी वर्गाकडून कौतुक होत आहे .
टिप्पणी पोस्ट करा