शिवम लटके ए.टी.एस.परीक्षेत केंद्रात पहिला,जिल्ह्यांत सातवा,तर राज्यात दहावा
माढा प्रतिनिधि. .माढा तालुक्यातील केवड येथील शिवम युवराज लटके हा इयत्ता दुसरी मध्ये उंदरगाव येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत शिकत असुन गेल्या एप्रिल मे महिन्यात घेण्यात आलेल्या ए.टी.एस.परीक्षेत 100 पैकी 82 गुण मिळवून माढा केंद्रात पहिला नंबर मिळवला व सोलापूर जिल्हात सातवा,तर राज्यात दहावा क्रमांक मिळवला आहे.
त्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कापसे सर, वर्गशिक्षका कापसे मॅडम, कदम सर ,कांबळे सर, सुतार सर ,व त्याचे पालक ,नातेवाईक ,समस्त केवड ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे .त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .
टिप्पणी पोस्ट करा