सांगोला तालुक्यात काँग्रेस घराघरात पोहोचवणार- अजितदादा चव्हाण



सांगोला तालुक्यात काँग्रेस घराघरात पोहोचवणार- अजितदादा चव्हाण

 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये आजादी गौरव पद यात्रेचे आयोजन केले आहे. याचेच निमित्त साधून सांगोला तालुका युवक काँग्रेसच्या वतीने सांगोला तालुक्यातील आजादी गौरव पदयात्रेला सुरुवात झाली. 

पद यात्रेची सुरुवात सांगोला तालुक्याचे पहिले आमदार व पहिले सांगोल्याचे सभापती काँग्रेसच्या माध्यमातून देणाऱ्या मेडशिंगी गावातून पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी सांगोला तालुक्याचे पहिले आमदार स्वर्गीय केशवराव राऊत यांचे चिरंजीव सुभाष राऊत व सांगोला तालुक्याच्या पंचायत समितीचे पहिले सभापती स्वर्गीय दादासाहेब शेंडे यांचे सुपुत्र अरुण भाऊ शेंडे यांच्या उपस्थित झाली.

 या पदयात्रेला सांगोला तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेडशिंगी गावातून सुरुवात होऊन पुढे आलेगाव वाकी घेरडी तसेच परिसरामध्ये मोठ्या उत्साही वातावरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही पदयात्रा संपन्न केली. या पदयात्रेमध्ये प्रत्येक गावातून स्वतःहून लोक जोडत जाऊन मोठ्या स्वरूपामध्ये ही पदयात्रा संपन्न झाली. 

या पदयात्रेला उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सध्या देशामध्ये सुरू असलेली हुकूमशाही महागाई यावर टीका करत पुन्हा एकदा भारताला गत वैभव फक्त काँग्रेस मिळवून देऊ शकते या पद्धतीचे मनोगत व्यक्त करण्यात आले. 

या पदयात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांतिक सदस्य प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील भोरे सर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भैया कांबळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित दादा चव्हाण, सोशल मीडिया अध्यक्ष इकबाल पटेल, युवक शहराध्यक्ष फिरोज मनेरी, ओबीसी तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर काळे, तसेच तालुका शहर सर्व पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments