अध्यक्षपदी नावडकर तर सचिवपदी कोळी यांची बिनविरोध निवड
माढा दि. १९
प्रतिनिधी.
माढा तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघाच्या नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
सन २०२२-२०२७ करिता झालेल्या निवड समितीच्या अध्यक्षस्थानी संघाचे ज्येष्ठ नेते आणि कृ.उ.बाजार समितीचे संचालक मोहन मोरे, जिल्हाध्यक्ष रविकांत सुर्वे यांच्यासह प्राचार्य हनुमंत अलदर उपस्थित होते.
शुक्रवार १९ रोजी सुनंदा विद्यानिकेतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडलेल्या निवडीमध्ये अध्यक्षपदी सुरेश नावडकर उपाध्यक्षपदी नेताजी उबाळे, शाहीर चव्हाण सचिवपदी दत्तात्रय कोळी, सहसचिवपदी मोहन अनपट, खजिनदारपदी विलास आतकर, सहखजिनदारपदी जगदीश निंबाळकर तर सदस्यपदी शंकर कदम, दिलीप गायकवाड, संतोष गायकवाड, अनिल वाघमोडे, राजेंद्र वाघ, महेश इंगळे, बाळकृष्ण पोटे, नितीन हांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवृत्त लिपीक अंकुश लक्ष्मण वाघमोडे यांचा सत्कार करण्यात आला. शासन दरबारी प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांचा आढावा घेण्यात आला यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित १०, २० आणि ३० वर्षांच्या आश्र्वसित प्रगती योजना, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित नियुक्त्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह शिक्षकेतर कर्मचारी पदभरती, थकीत फरक आणि वैद्यकीय बिले, सेवापुस्तक नोंदी विषयी चर्चा आणि मार्गदर्शन झाले. येत्या काळात शिक्षकेतर बांधवांच्या सर्वच प्रश्न आणि अडचणींबाबत संघटना आक्रमक भूमिका घेऊन उपोषण, मोर्चे आणि आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुर्वे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पावणे यांनी केले तर आभार दत्ता कोळी यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा