केवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोउत्सव उत्साहात साजरा.
माढा.प्रतिनिधि- केवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोउत्सव उत्साहात साजरा....
माढा तालुक्यातील केवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते चौथी मद्ये नवीन प्रवेश घेतलेले विध्यार्थी व इतर नियमित विध्यार्थ्यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान लटके व इतर सदस्य , मुख्याध्यापक बाळासाहेब भोईटे यांच्या हस्ते गुलाब पुस्प ,नवीन पाठ्यपुस्तकं , नविन गणवेश वाटप,चॉकलेट देऊन मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले .यावेळी कै.बालाजी लटके युवा प्रतिष्ठान केवड यांच्या वतीने ऑडिओ चार्ट वाटण्यात आले .
यामुळे विध्यार्थ्यांना बेशिक घटक शिकन्यास मदत होणार आहे . यावेळी पालक , विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जाधव सर यांनीं केले तर आभार चव्हाण सर यांनी मानले .
टिप्पणी पोस्ट करा