शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ऍड.समाधान लटके यांची तर उपाध्यक्षपदी सौ.वंदना उमेश लटके यांची निवड
माढा.प्रतिनिधी - शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ऍड.समाधान लटके यांची तर उपाध्यक्षपदी सौ.वंदना उमेश लटके यांची निवड ..... माढा तालुक्यातील केवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाअध्यक्ष व सदस्य यांच्या निवडी करन्यात आल्या.
शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोईटे यांनी या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या निवड प्रक्रिया समजावून सांगीतली. सुरुवातीला इयत्ता पहिली मधुन पालकां मधून सौ. राधिका नागनाथ मोरे , विठ्ठल भाऊ धर्मे यांची बिनविरोध निवड करन्यात आली .
अध्यक्ष पदासाठी समाधान अरुण लटके यांचे नाव पालकांनी सुचविले तर उपाध्यक्षपदी सौ .वंदना उमेश लटके यांचे नाव सुचविले .मुख्याध्यापकानी सर्व पालकांच्या संमतीने या दोघांच्या निवडी बिनविरोध जाहीर केल्या . या निवडी नंतर अध्यक्ष व उपाअध्यक्ष यांचा सत्कार प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच अमोल लटके, माजी उपसरपंच भारत लटके ,माजी सरपंच पांडुरंग सिरसट ,सचिन धर्मे, दत्तात्रय जाधव ,विठ्ठल लटके,गणेश जाधव,बिपीन करंडे, चंद्रकांत लटके,नागनाथ मोरे, भागवत करंडे,अण्णासाहेब कोळेकर, मालोजी पिंजारी, विठ्ठल धर्मे ,इ. पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडी बद्दल सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जाधव सर केले तर आभार चव्हाण सर यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा