1) सोलापूर रोड वरील नगरपालिका 8 नंबर शाळेसमोरील पाईपलाईन लिकेज काढण्या बाबत. ( 2 ) सोलापूर रोडवरील चर्च ते शाळा क्रमांक 8 मागील उर्वरित राहिलेली ड्रेनेज चे काम पूर्ण करणे बाबत. 3) सोलापूर रोडवरील उड्डाणपुला जवळचा कोंबड्यांचा कचरा काढण्याबाबत. 4) बार्शी शहरातील पाणीपुरवठा नियमित करणे बाबत.
बार्शी शहरात गेले अनेक दिवस पाणीपुरवठा अनियमित होत असून नागरिकांचे हाल होत आहेत भर उन्हाळ्यात पाणी आठवड्यातून दोन वेळेस किंवा एक वेळेस येत आहे तरी शहरातील पाणीपुरवठा नियमित करावा व गेले अनेक दिवस सोलापूर रोड वरील नगरपालिका शाळेसमोरील पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाण्याचे वेस्टेज होत असून लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्ती करून पाण्याचे वेस्टेज थांबवावे, सोलापूर रोडवरील चर्च ते 8 नंबर शाळे मागील उर्वरित राहिलेली ड्रेनेज चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व अनेक दिवसांपासून सोलापूर रोड वरील उड्डाणपुला जवळ कोंबड्यांची घाण कचरा होत असून त्या परिसरात घाणीचे साम्राज्य झाले असून दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, रोडवरील कोंबड्यांची घाण खाण्याकरिता कुत्रे रोडवरून धावत असून रोडवर एक्सीडेंट होण्याचे शक्यता नाकारली जाऊ शकत नाही, व अनेक जण मॉर्निंग करिता जात असताना दुर्गंधीमुळे मॉर्निंग वॉक करणे अशक्य झाले आहे, तरी आमच्या मागण्या आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा बार्शी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश नवगिरे यांनी दिला,
यावेळी विकास नवगिरे, उमेश नेवाळे स्टीफन नवगिरे, अक्षय साने, शालोम दाखले आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा