सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कैलास आडे यांच्या मागे लागली चौकशी

ब्रेकींग : सोलापूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांची लागली चौकशी

सोलापूर : सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान दीपक गवळी यांनी सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कैलास आढे, पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी आश्रमशाळांना अनुदान वाटप करत असताना सर्व नियम धाब्यावरती बसून संस्थाचालकाकडून आमाप माया जमवली आहे. ही माया जमवत असताना टेंभुर्णी आश्रम शाळेतील कार्यरत शिपाई किसन पाटील या शिपायामार्फत कोट्यावधीचा पैसा गोळा केला केलेला आहे व सध्याही हा प्रकार चालूच आहे. ही माया जमत असताना किसन पाटील व संस्थाचालक यांच्यामध्ये पैशाच्या मागणीचे फोन संभाषणे ही बरीच व्हायरल झालेली आहेत. जे संस्थाचालक पैसे देण्यास तयार होत नाहीत त्यांना कारवाईची भीती दाखवून किसन पाटील हा संस्थाचालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून पैशाची मागणी करत आहे व पैसे दिल्या खेरीज कोणतेही काम केले जात नाही. परिपूर्ण प्रस्ताव देखील धुळखात पडलेले आहेत. तसेच किसन पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे पैसे देणाऱ्याचे प्रस्ताव तात्काळ त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुटप करून वरिष्ठ कार्यालय सादर केले जातात. असा आरोप गवळी यांनी केला होता. 
या प्रकरणाची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशी साठी नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांना चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. सादर प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या आंदोलनात शुभम बंगाळे, आदित्य वाघमारे, विकास सोनवणे, विश्वास नागमोडे, मुकेश बनसोडे, तुकाराम भोसले, सागर गायकवाड यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments