भैरवनाथ प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा

माढा तालुक्यातील केवड येथील भैरवनाथ प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गावातुन सुरुवातीला प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभात फेरी मध्ये वेगवेगळ्या देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्यामुळे सर्व गावांमध्ये देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर प्रशालेमध्ये केवड गावातील माजी स्वातंत्र्यसैनिक ज्योतीराम भोकरे मेजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.हर घर तिरंगा अभियान अंतर्गत प्रशालेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, या स्पर्धा  गावातील समज्योती महिला फाउंडेशन केवड यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले .तसेच दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या तीन विध्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले .प्रशालेतील अनेक विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डॉ. दादासाहेब लटके यांनी सांगितले कि सेंद्रिय शेती हि काळाची गरज आहे. आपण मुलांना सेंद्रिय शेतीचे फायदे समजावुन सांगितले पाहिजेत. या नंतर समज्योती महिला फाऊंडेशन केवड्च्या अध्यक्षा सौ ज्योती लटके यांनी सांगितले कि आमच्या संस्थेमार्फत असे उपक्रम राबविण्यात येतील व विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणीक मदत केली जाईल. तसेच मुलींना सेनेटरी पॅड मोफत दिले जाईल.कै. बालाजी लटके युवा प्रतिष्ठानच्या वतीने विध्यार्थ्यांना होली बॉल व नेट भेट देण्यात आली . संपादक समाधान लटके यांनी सांगितले कि शाळेच्या गुणवता व भौतिक विकासासाठी मदत करणार आहे .या कार्यक्रमासाठी सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील, उपसरपंच अमोल लटके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, माजी उपसरपंच सुग्रीव धर्मे ,मारुती लटके मेजर, महादेव गायकवाड मेजर, महादेव अक्कलकोटे मेजर,अप्पासाहेब मिरगणे, संभाजी लटके, भाजपा युवा मोर्चा चे सरचिटणीस सत्यवान लटके, दत्तात्रय सोनशिळे, पोपट घुले , काका पिंजारी , अप्पा धर्मे, इ.ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौ. सुनंदा बनसोडे, रघुनाथ मिरगणे, अनिल बरकडे,अमोल पाटील,दिपक पाटील, महंमद मुढे, महादेव दळवी, महादेव लटके,सुधिर कदम  यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंढे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल बरकडे सर यांनी मांडले .

0/Post a Comment/Comments