महाराष्ट्रातील शिक्षकांचा अपमान करण्याचा अधिकार भाजपा आमदारांना कोणी दिला?

महाराष्ट्रातील शिक्षकांचा अपमान करण्याचा अधिकार भाजप आमदारांना कोणी दिला?
युवक काँग्रेस नेते शाहूराजे जगताप यांचा घणघणात 

महाराष्ट्रातील गोरगरीब,कष्टकरी ,शेतकरी व आर्थिक मागासलेल्या घटकांच्या मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक की ज्यांच्या विश्वासावर ते पालक आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या  व स्वतःच्या स्वप्नांना आकार देऊ शकतात आशा शिक्षकांविषयी भाजपचे गंगापुर - खुलताबाद चे आमदार श्री प्रशांत बंब यांनी फोनवर एकेरी शब्द वापरत त्यांचा अपमान केला गेला त्याची क्लिप सर्वत्र व्हायरल होत असून त्याचा निषेध युवक काँग्रेस च्या वतीने नोंदवला गेला . पावसाळी अधिवेशनात शिक्षणविषयक  सत्रात प्रश्न मांडत असताना भाजप आमदार श्री प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी प्रश्न मांडला होता त्याविषयी एका जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींनी आमदार बंब यांना फोन केला आता त्यांच्याशी फोनवर बोलताना आमदार बंब यांनी एकेरी व शिवराळ शब्दांचा वापर करत तमाम शिक्षकांचा अपमान केल्याचा निषेध सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव शाहूराजे जगताप यांनी भाजपवर सडकून टीका करत महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या पाठीशी युवक काँग्रेस ताकतीने उभे राहील अशी ग्वाही दिली.त्यासोबतच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या जीवघेण्या महागाईच्या काळात स्वतःच पोट भरण्यासाठीचा संघर्ष करावा लागत असताना स्वतःच्या मुलांना शिक्षण देणं हे दुर्लभच झाले आहे परंतु ती उणीव जिल्हा परिषदे ची शाळा व पर्यायाने त्या शाळेतील शिक्षकच आजच्या घडीला भरून काढू शकतात त्याच शाळेत पोटतिडकीने शिकवणारे शिक्षक की ज्यांना आपण गुरू मानतो अशा गुरूंना सत्तेच्या नशेत असलेल्या भाजपचे आमदार सन्मानिय  श्री प्रशांतजी बंब  यांनी एका गुरुजींना फोनवर बोलताना असंसदीय भाषेत बोलत शिक्षकांविषयी एकेरी अपशब्द वापरत  महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांचा  अपमान  भाजपचे आमदार श्री बंब यांनी केला आहे .ज्या शाळेत या देशाची भावी पिढी घडवण्याचे पवित्र काम हे जे शिक्षक करतात आणि या पुरोगामी महाराष्ट्रात त्याच शिक्षकांचा आपमान होत असेल ते या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.भविष्यात असे कृत्य झाल्यास आमचे महापुरुष, प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शिकवले आहे की
  "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पेईल तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही" 
आणि याच शिकवणीनुसार जिथं जिथं आमच्या गुरुजींचा आपमान होईल तिथं युवक काँग्रेस गांधीगिरी मार्गाने गुर्गुर्ल्याशिवाय राहणार नाही असा इशारा युवक काँग्रेस नेते शाहूराजे जगताप यांनी दिला.

0/Post a Comment/Comments