माढा तालुक्यातील माढा मुली व उपळाई बुद्रुक केंद्रात आज माहेजुलै महिन्याची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख श्री दिगंबर काळे यांनी माढा व उपळाई केंद्रातील शाळेच्या गुणवत्तेचा आढावा व शासनाच्या शिक्षण विभागाची विविध ध्येय धोरणे, योजना, या परिषदेच्या माध्यमातून केंद्रातील शिक्षकांना याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
माढा मुली व उपळाई बुद्रुक केंद्राच्या या शिक्षण परिषदेचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख श्री दिगंबर काळे सर, प्रभारी केंद्रप्रमुख सुरेश माळी, तंत्रस्नेही शिक्षक श्रीकांत काशीद ,मुख्याध्यापक विजय काळे, सवेंद्र लंकेश्वर, श्याम चव्हाण,आदि प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये श्री सवेंद्र लंकेश्वर यांनी मानवतेच्या प्रार्थनेचे सादरीकरण केले. श्री श्रीकांत काशीद सर यांनी सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका याविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका संकल्पना शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले आहे या स्वास्थ पत्रिकेमुळे विद्यार्थ्यांची,शाळेची गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे. यानंतर दुसरे मार्गदर्शक श्री श्याम चव्हाण यांनी निपून भारत अंतर्गत भाषा विषयाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांची इयत्ता निहाय अध्ययन क्षमता याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यानंतर श्री प्रशांत ओहोळ यांनी निपुण भारत अंतर्गत गणित विषयाची उद्दिष्टे व विद्यार्थ्यांना गणित व व्यवहाराची सांगड याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये श्री शिवाजी कदम यांनी पेट परीक्षा अंतर्गत पायाभूत चाचणी, नियतकालिक चाचणी व मूल्यमापन पद्धती याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष कर्तव्यदक्ष ,शिस्तप्रिय, केंद्रप्रमुख श्री दिगंबर काळे सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शैक्षणिक स्वास्थ्य पत्रिका संपूर्ण महाराष्ट्रभर एक नाविन्यपूर्ण उपक्रम शासनाच्या वतीने राबवला जात आहे. जशी आपल्या व्यक्तिगत आरोग्याची आरोग्य पत्रिका असते तशी विद्यार्थी, शिक्षक ,शाळा यांच्या गुणवत्तेची स्वास्थ्यपत्रिका या पद्धतीच्या माध्यमातून निश्चित होणार आहे. निपुण भारत एक नाविन्यपूर्ण प्रशिक्षण असून या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय व विषयनिहाय उद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पायाभूत चाचण्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती निश्चित होण्यास मदत होणार आहे. या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शासनाचे शिक्षण, अध्ययन ,अध्यापन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण बदल हे प्रामुख्याने आपल्या केंद्रातील शिक्षकांनी आत्मसात केले पाहिजेत. या शिक्षण परिषदेत शिक्षकांनी चर्चात्मक सहभाग घेतला. या केंद्रातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची व आपल्या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा अंतर्गत स्कॉलरशिप, नवोदय, नाविन्यपूर्ण उपक्रम सतत राबवले पाहिजेत हे उपक्रम केंद्रातील सर्व शाळांनी राबवावेत यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असे मत यावेळी केंद्रप्रमुख काळे सर यांनी मांडले. या शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री वैजीनाथ मोगल यांनी केले तर आभाप्रदर्शन मुख्याध्यापक विजय काळे यांनी मांडले.
टिप्पणी पोस्ट करा