युवक काँग्रेसचे राकेश नवगिरे यांच्या प्रयत्नांना यश..!


युवक काँग्रेसचे राकेश नवगिरे यांच्या प्रयत्नांना यश..!!

अडीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या सोलापूर रोड येथील नगरपालिका शाळा आठ नंबर समोरील पाईपलाईन लिकेज आज काढण्यात येत आहे हा लिकेचा प्रश्न गेले अडीच वर्ष असून यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते शेजारीच गटार असल्याकारणाने गटारीचे पाणी त्या पाईपलाईन मध्ये मिक्स होऊन तेच पाणी नागरिकांना सोडण्यात येत होते व यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, ही पाईपलाईन लिकेज साठी काढण्यासाठी राकेश नवगिरे यांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले होते व आंदोलनाचा देखील इशारा दिला होता व गेल्या एक मार्च रोजी नवीन मुख्याधिकारी मा. बाळासाहेब चव्हाण यांना स्मरणपत्र देउन समस्यांवर सविस्तरपणे सांगून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असे निवेदन मुख्याधिकारी दिले असता फक्त पाच दिवसात हा प्रश्न मार्गी लागला आहे व त्यामुळे लाखो लिटर पाण्याची वेस्टेज थांबविण्यात राकेश नवगिरे यांना यश आले आहे राकेश नवगिरे यांच्या कामाचे सर्वत्र चर्चा चालू असून सोलापूर रोड वरील सर्व नागरिक त्यांच्या कामाची प्रशंसा करत व त्यांना शुभेच्छा देत आहेत. यावेळेस राकेश नवगिरे यांनी मुख्याधिकारी साहेब बार्शी व पत्रकार बांधवांचे प्रामुख्याने आभार मानले आहे...!!

0/Post a Comment/Comments